सावधान ! आठवडे बाजारातील वाहतूक कोंडी,अस्ताव्यस्त लागणाऱ्या जवळपास पन्नास पेक्षा अधिक गाड्यांवर दंडात्मक कारवाई
नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा सूचना वजा इशारा

पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक आणि व्यापारी आपापली वाहने कुठेही अस्ताव्यस्त लावतात. बाजार दिवशी नागरिकांना अडचणी निर्माण होत होत्या. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिक,व्यापारी याच्यासाठी वाहन पार्किग साठी मराठी शाळेचे मैदान तसेच वनविभाग कार्यालयाजवळील जागा उपलब्ध करून देण्यात आली.नागरिकांनी दंडात्मक कारवाई होऊ नये यासाठी लोणी काळभोर ग्रामपंचायत व वाहतूक विभाग पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे . भरत काळभोर सरपंच लोणी काळभोर
मोटार वाहन कायद्यातील कलम 122 नुसार सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वाहन पार्क करणे किंवा सोडणे, ज्यामुळे इतर वाहनचालकांना किंवा पादचाऱ्यांसाठी धोका निर्माण होऊ शकतो, या कलमांतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल केले जातील नागरिकांनी व व्यापारी यांनी नियमांचे पालन करावे.
राजेंद्र पवार पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग पुणे शहर )