शहीद भगतसिंग स्मृतिदिनानिमित्त लोणी काळभोर (माळी मळा) येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..!
शिबिरामध्ये 385 जणांना मोफत हेल्थ कार्डचे वाटप

लोणी काळभोर : हवेली तालुका शिवसेना उध्द्वव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शहीद भगतसिंग – सुखदेव – राजगुरू यांच्या ९४ वा स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले तसेच त्या निमित्ताने लोणी काळभोर (माळी मळा ) येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन शहीद भगतसिंग – सुखदेव – राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह (Bhagat Singh), राजगुरु (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा येतो. भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून मानला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव ही नावे त्यात अग्रणी आहेत. लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या घातल्या. नंतर या प्रकरणाचा ठपका ठेऊन भगतसिंहावर खटला चालवण्यात आला. या प्रकरणात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची अंमलबजावणी 1931 साली करण्यात आली. त्यांना 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी फाशी देण्यात आली होती. हाच दिवस देशात “शहीद दिन” म्हणून मानला जातो.
या शहीद दिना निमित्त शिवसेना हवेली तालुका उपप्रमुख हनुमंत सुरवसे व लोणी काळभोर विविध विकास कार्यकारी सोसायटी चे मा. चेअरमन व विद्यमान संचालक संजय भालेराव व तसेच डॉ. विजय पाटील यांचे स्टार हॉस्पिटल, कदमवाकवस्ती यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी चे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरामध्ये 385 जणांना मोफत हेल्थ कार्ड चे वाटप करण्यात आले, या वेळी लोणी काळभोर चे सरपंच भरत काळभोर, पंचायत समिती उपसभापती सनी काळभोर, शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर, ग्रा.पं. सदस्य नागेश काळभोर, अमित काळभोर, संजय राखपसरे, सूर्यकांत इंगळे,अतुल शिंदे,अजय मोरे, श्रीकांत शेलार, स्वप्नील शिंदे,राहुल धेले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.