
पुणे- : वाघ यांच्या हत्येला ३६ तास उलटल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. कुणाला अटक करण्यात आली नव्हती. मात्र आता हडपसर पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेच्या पथकांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी ८ ते १० संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्यास भेट घेऊन तपासाबाबत सूचना दिल्या. गुन्हे शाखेच्या २० पथकांकडून तपास सुरू करण्यात आला. हडपसर, फुरसुंगी, सोलापूर रस्ता परिसरातील ४०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोेलिसांनी तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पसार झालेल्या एक आरोपी सराइत गुन्हेगार असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. वाघ यांच्या खूनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. तपासात याबाबतची माहिती मिळेल.
सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा पवन शर्मा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणातील इतरही फरार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे, संबंधित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आले.या प्रकरणात नवनाथ गुरसाळे हे नावंही समोर आलं आहे. गुरसाळे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो, तर शर्मा हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपींची सतीश वाघ यांच्यासोबत वैयक्तिक दुश्मनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता ही दुश्मनी कशामुळे झाली आणि हत्येचं कारण काय असू शकतं, याचा तपास पोलीस करत आहेत