
पुणे – श्री क्षेत्र देहू येथील शेतकरी कुटुंबातील, वारकरी संप्रदायातील संतोष सदाशिव हगवणे यांची आज भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा सचिव पदी एकमताने निवड झाली. तसे पत्र भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिले.
संतोष हगवणे हे युवा उद्योजक असून. कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत. वारकरी संप्रदायात त्यांना मृदुंगाचार्य म्हणून ओळखले जाते.. वृक्षदायी संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे ते वृक्षरोपणाचे काम करत आहेत. इंद्रायणी स्वच्छता मोहिमेतही त्यांचा मोठा सहभाग होता. पाणी आडवा पाणी जिरवा यासारख्या मोहिमेत त्यांनी हिरारीने भाग घेतला होता.. देहूचे उपसरपंच पदवी त्यांनी यापूर्वी भूषवले होते.
अटल बिहारी वाजपेयी यांचा बीजेपीचा वारसा त्यांनी आतापर्यंत जपला आहे. वैचारिक बुद्धिमत्ता, आणि विरोधकांनाही जवळ करणे हे त्यांचे राजकीय सूत्र आहे. विरोधासाठी विरोध करणे यापासून ते चार हात लांबच राहिलेत.. रिपाई गटाचे अध्यक्ष संतोष चव्हाण पाटील यांनी संतोष हगवणे यांच्या निवडीचे स्वागत करताना सांगितले की, अतिशय स्वच्छ प्रतिमा असणारे हे हगवणे, यांच्या निवडीमुळे पुणे जिल्ह्यात भाजपने एक चांगला चेहरा दिला आहे.. युवा उद्योजक आणि युवा नेता सागर मुसुडगे यांनी निवडीचे स्वागत करताना सांगितले की,माजी मंत्री आणि आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्व खाली हगवणे यांनी राजकीय वाटचाल सुरु ठेवली आहे.
झाडे लावा झाडे जगवा, या उपक्रमातून हगवणे यांनी खूप मोठे कार्य केलेले आहे. युवा पिढीला यापुढे रोजगार मिळतील अशी अपेक्षा आम्हाला नक्कीच आहे, असे सागर मुसूडगे यांनी सांगितले.. तर देहू भाजपा अध्यक्ष मच्छिन्द्र परंडवाल यांनी सांगितले की लवकरच मोठा सत्कार समारंभ देहूकराच्या वतीने करण्यात येईल..या निवडीचे स्वागत मोठ्या आनंदाने होत आहे.