पुणे- :
शिरूर तहसील कार्यालय येथे पाच हजाराची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले असल्याची माहिती पुणे .लाच लुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली आहे.
नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर (पद महसुल सहायक, शिरूर तहसील कार्यालय) यांना पकडण्यात आले आहे. या अगोदरही याच अधिकाऱ्यावर इंदापूर मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने विभागाने कार्यवाही केलेली आहे.
याबाबत मिळालेली माहिती पुढील प्रमाणे
यातील २८ वर्षे पुरुष तक्रारदार यांचे गट नंबर १९ च्या सात-बारा उता-यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी तक्रारदार यांनी तहसिलदार कार्यालयास अर्ज केला होता. सदरचा अर्ज लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर यांचेकडे प्रलंबित असून, तक्रारदार यांचे सात-बारा उता-यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी लोकसेवक नितेश धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांचेकडे ५ हजार रुपये लाच मागणी केलेबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचकडे दिली होती.
सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी ५ हजार रुपयाची लाच मागणी करुन, ती लाच रक्कम रुपये ५ हजार (पाच हजार) तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्विकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे तपास करत आहेत.
सदरची कारवाई पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.