मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर 11 दिवसांनी सुटला आहे. देवेंद्र फडणवीस उद्या मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेणार आहे. अखेर विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावेळी अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली होती. अखेर आज 51 दिवसांनी अमित शाहांचे ‘ते’ शब्द खरे ठरले, याविषयी जोरदार चर्चा रंगत आहे.
जागावाटपाच्या चर्चावेळी अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देताना देवेंद्र फडणवीसांनी त्याग केल्याची आठवण केली होती. अमित शाहांच्या त्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. चर्चांनंतर भाजपने ते वृत्त फेटाळले होते. मात्र आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री पदाची घोषणा झाली.एकनाथ शिंदे मंत्रीमंडळात सहभागी होणार आहे की नाही अद्याप हा प्रश्न अनुत्तरीत आहे. देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च सांगितले की मी शिंदेंना विनंती केली आहे. शिंदेंनी आज रात्रीपर्यंत अंतीम निर्णय जाहीर करण्याचे सांगितले आहे.
काय म्हणाले होते अमित शहा ?
शिंदे जी, या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्त्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे आथा तुम्ही झुकतं माप द्यावं.