वाहन चालकांनो सावधान ! शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई …
५०६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ६०१ वाहनचालकांकडून दंड २१ लाख रुपयांचा दंड वसूल

पुणे (सिटीझन न्यूज नेटवर्क ) -: खराडी येथे शालेय वाहतूक करणाऱ्या बसला आग लागल्याची घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता . शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केली जात असल्याचे उपप्रादेशिक विभागाच्या (आरटीओ) नियमित तपासणीतून समोर आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर ‘आरटीओ’ने नव्याने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत एक हजार ५०६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ६०१ वाहनचालकांकडून दंड २१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
त्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून या तपासणी मोहिमेत राज्य सरकारने ठरवून दिलेल्या वाहतूक नियमावलीनुसार वाहन योग्यता तपासणी प्रमाणपत्र, वाहतूक परवाना, चालकाचा परवाना, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी), प्रथमोपचार औषधांचा संच, वाहनामध्ये मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या, खिडक्या, पायऱ्या, अग्निरोधक उपकरणे आदींची तपासणी करण्यात येत आहे. तसेच, सीएनजी वाहन असल्यास सीएनजी योग्यता प्रमाणपत्र पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली.
‘आरटीओ’ने जानेवारी ते नोहेंबर पर्यंत केलेली कार्यवाही
एकूण शालेय वाहन तपासणी – १,५०३
दंडात्मक कारवाई केलेले वाहनचालक – ६०१
वसूल केलेली दंडात्मक रक्कम – २१.९९ लाख