लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट होणार गोड- अदिती तटकरेंनी
Ladki Bahini Yojana: लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद होणार का? स्क्रूटिनी बाबत अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई (सिटिझन न्यूज नेटवर्क) -: लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यावर 24 डिसेंबरपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांनी जुलै ते ऑगस्ट दरम्यान अर्ज भरले आहेत, त्यांना पहिला लाभ मिळणार आहे. तर उर्वरित महिलांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळेल. डिसेंबर अखेरपर्यंत महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीणचा हप्ता खात्यावर जमा होणार होता, मात्र सरकार स्थापनेला उशीर झाल्याने हा हप्ता उशिरा मिळत आहे.
वर्षाचा शेवट गोड करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याच पार्श्वभूमीवर 31 तारखेपर्यंत बहिणींच्या खात्यावर पैसे येणार आहेत. लाभार्थी महिलांना 1500 रुपयेच मिळणार आहे. सरकारने 2100 रुपये मिळतील अशी घोषणा केली होती. मात्र यासाठी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागणार अशी माहिती न्प्रसार माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी दिली.
बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, निकष कठोर होणार, महिलांचा अर्ज बाद होणार, महिलांना लाभ मिळणार नाही अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र कागदोपत्री अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत कुठलाही लेखी शासननिर्णय तूर्तास तरी झालेला नाही. सध्यातरी कुठल्याही निकषात बदल करण्यात आला नाही. आम्ही तेव्हाही एका गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी फेरतपासणी असेल ती तक्रारनिहाय असेल. ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्याचे अर्ज आणि कगदपत्रांची पडताळणी केली तेव्हा बऱ्याच तक्रारी आल्या, ज्या ज्या वेळी तक्रार आली तेव्हा क्रॉस व्हेरिफिकेशन करून ते अर्ज बाद केले आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असंही सांगितलं.