लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावर जमा होईल – आदिती तटकरे
सध्या तरी 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार

मुंबई-: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसून अर्जांची छाननी करण्याचा कोणताही निर्णय नसल्याचं माजी महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राटचं बजेट होईपर्यंत महिलांच्या खात्यावर सध्या तरी 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. 2100 रुपये बजेटनंतर महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येतील असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे महिलांना आणखी थोडी वाट पाहावी लागू शकते.
2100 रुपये देणार असल्याची घोषणा झाली असली तरी अजून महिलांना त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढच्या बजेटमध्ये 2100 रुपये महिलांसाठी देण्याबाबत प्रस्ताव मंजूर केला जाईल त्यानंतर महिलांना लाभ मिळणार आहे. त्याआधी महिलांना 1500 रुपये खात्यावर जमा होणार आहेत. ज्यांचे आधीचे हप्ते राहिले आहेत, त्यांच्याही खात्यावर लवकरच रक्कम जमा केली जाईल.
महिलांना 3000 देणार अशी खोटी घोषणा केली,त्यामुळे लाडक्या बहिणींनी विरोधकांना योग्य उत्तर दिलं आहे असं म्हणत आदिती तटकरे यांनी विरोधकांवर टोला लगावला आहे. शिवाय लाडक्या बहिणीच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार नाही, जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत ती करणार नाही असंही आदिती तटकरे म्हणाल्या.