
पुणे-: सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहणााऱ्या व्यक्तीच त्यांच्या खूनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपीनेच पूर्व वैमनस्यातून सतीश वाघ यांचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे
मिळालेल्या माहितीनुसार सतीश वाघ यांचा खून पूववैमनस्यातून झाला आहे. वाघ यांचा खून करण्यासाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती. चार ते पाच महिन्यांपासून वाघ यांच्या खुनाचे आरोपी प्लानिंग करत होते. वाघ यांच्याकडे काही वर्षापूर्वी अक्षय जावळकर नावाचा भाडेकरू राहायला होता. हाच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याआधी पुणे पोलिसांनी पवन शर्मा आणि नवनाथ अर्जुन गुरसाळे यांना अटक केली आहे.
पूर्वी भाडेकरू म्हणून राहणारा अक्षय जावळकर आणि सतीश वाघ यांच्यात भांडण होते.त्या भांडणातून दोघांमध्ये वितुष्ट आले होते. या कारणावरून अक्षय जवळकर याने मागील चार ते पाच महिन्यापूर्वी वाघ यांना ठार मारण्याची सुपारी पवन शर्मा याला दिलेली होती. मागील चार ते पाच दिवसांपूर्वी पवन शर्मा याने त्यांचे साथीदार नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे आणि इतरांनी कट रचला. तसेच अक्षय जावळकर यांच्याकडून रक्कम देखील स्वीकारली. वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना ठरल्याप्रमाणे आरोपींनी आधी त्यांचे अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांचा खून केला.
वैयक्तिक कारणातूनच हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. याप्रकरणी आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे. ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केलीय. या संपूर्ण घटनेच्या बाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे.