
लोणी काळभोर : घरफोडी व मोबाईल चोरी प्रकरणातील सराईत आरोपीस गुन्हे शाखा पथक ६ च्या पोलिसांनी लोणी काळभोर परिसरातुन अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.गुलाम रजा उर्फ मसाट मजलुम सय्यद इराणी (वय -२६, रा. पठारे वस्ती,लोणी काळभोर )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे पथक शाखा ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण,सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे व इतर पथक लोणी काळभोर परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की,घरफोडी व मोबाईल चोरी प्रकरणातील रेकॉर्डवरील आरोपी गुलाम रजा उर्फ मसाट मजलुम सय्यद इराणी हा आपल्या राहत्या घरी आला आहे.त्यावरून त्या आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा वाघोली येथील दोन गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने पुढील कारवाईसाठी त्यास वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,गुन्हे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे,गुन्हे सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथक सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण,सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे,पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी,पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकाटे,सुहास तांबेकर,नितीन मुंडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे,सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, गणेश डोंगरे,शेखर काटे, नितीन धाडगे, सचिन पिलाने,बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे या पथकाने केली.