pune

पुरंदर विमानतळ झाल्यावर स्थानिकांच्या मुलांना नोकऱ्या द्या – हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर

पुणे -:  शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबत राज्य सरकारने हात आखडता घेऊ नये, तसेच याबाबत अथवा त्यांच्या पुनर्स्थापना, नवीन विमानतळावर नोकरी मिळणे इत्यादी बाबतीत एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घ्यावी, असे मत हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी व्यक्त केले.

पुरंदर विमानतळ हा राज्याच्या अखत्यारीतला प्रकल्प असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेल्या घोषणा या नक्कीच विश्वसनीय आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्प सद्यः स्थितीपर्यंत आणण्यासाठी मोठी मेहनत घेतलेली आहे. मध्यंतरी काही वर्षे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली नसती, तर कदाचित पुरंदर विमानतळ आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असते.

 आता पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर विमानतळासाठी टाकलेली पावले ही अत्यंत योजनावद्ध व आश्वासक असून, या प्रकल्पास वेग देणारी आहेत. त्यांच्या नेतृत्वात पुरंदर विमानतळ नक्कीच पूर्ण होईल, यात शंका नाही, असेही मत धैर्यशील वंडेकर यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!