लोणी काळभोर गावासाठी स्वतंत्र तलाठी नेमणूक करावी

लोणी काळभोर : नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन लोणी काळभोर गावासाठी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) नेमण्यात यावा अशी मागणी हवेली तालुका शिवसेना (ठाकरे गट) यांनी निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .
गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मौजे लोणी काळभोर गाव हे विकसीत गाव असुन या गावासाठी सध्या कार्यरत असलेले ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांच्या कडे अतिरिक्त कार्यभार असल्याकारणाने गोर-गरीब, शेतकरी , विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती,महिला वर्ग यांची कामे वेळेत होत नसुन त्यांना वारंवार तलाठी कार्यालय बंद असल्या कारणास्तव सतत चकरा माराव्या लागतात.
या सर्व गोष्टी लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव तसेच शिवसेना (ठाकरे गट) हवेली तालुका उपप्रमुख हनुमंत सुरवसे यांनी निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले, मौजे कदमवाकवस्ती, सिद्राममळा या प्रमाणेच लोणीकाळभोर गावासाठी एक स्वतंत्र ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांची नेमणूक करावी, या वेळी येत्या आठ दिवसात लोणी काळभोर गावासाठी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) दिला जाईल असे आश्वासन निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिले.