कामगार दिनानिमित्त लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कर्मचारी व कृषिनिष्ठ शेतकरी यांचा सन्मान

लोणी काळभोर – देशाच्या जडणघडणीत कामगारांचा मोठा वाटा असून कामगार हा सर्व क्षेत्रात त्या व्यवस्थेचा कणा म्हणून काम करत असतो असा कामगारांचा गुणगौरव करून त्यांना सन्मानित करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी गणेश धस यांनी केले.
महाराष्ट्र्र दिन व कामगार दिनानिमित्त लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामपंचायत कामगार तसेच परिसरातील काही शेतकरी बंधूना गुणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर ,शिवदास काळभोर,दादा पाटील काळभोर,उपसभापती सन्नी काळभोर,माजी सरपंच योगेश काळभोर,ग्रा.पं. सदस्य नागेश काळभोर,अमित काळभोर,सागर काळभोर,माधुरी काळभोर,ज्योती काळभोर,संगिता काळभोर सर्व ग्रा.पं.कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना धस म्हणाले कि मी अनेक वर्ष शासकीय सेवेत काम करत आहे परंतु माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कर्मचारी व शेतकरी बंधूना ग्रामपंचायत स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे . ग्रामपंचायतीचा मुख्य भाग म्हणजे तो कामगार असतो रात्री अपरात्री गावासाठी अहोरात्र सेवा देण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचारी करत असतात त्यांच्या कामाची शाब्बासकीची थाप त्यांना दिली गेले पाहिजे ते काम लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सरपंच भरत काळभोर यांनी केले आहे. यावेळी त्यांनी जमलेल्या शेतकरी वर्गाला शासन स्तरावरील योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.